केंद्र सरकारकडून 132 पद्म पुरस्कारांची घोषणा

0
11

>> वेंकय्या नायडू, वैजयंतीमाला यांना पद्मविभूूषण

केंद्र सरकारतर्फे यंदाच्या पद्म पुरस्कारांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल दि. 25 रोजी जाहीर करण्यात आली आहेत. यात 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वेंकय्या नायडू, अभिनेत्री वैजयंतीमाला, दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी, भारतीय शास्त्रीय भरतनाट्यम नर्तक पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मिथून चक्रवर्ती, उषा उत्थुप, माजी मंत्री राम नाईक, कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार कला, समाज कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, उद्योग, साहित्य, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्यांना दिले जातात.

यंदा पद्म पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये 30 महिलांचा समावेश आहे. यात 8 विदेशी, एनआयआर, पीआयओ अशा विभागातील असून 9 जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी दि. 23 रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

भारत सरकारकडून 1954 पासून भारत रत्न आणि पद्म पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे. 1955 पासून पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण अशा तीन विभागात देण्यास सुरूवात झाली.