तामिळनाडूत थेट प्रक्षेपणास बंदी ः सीतारमण यांचा आरोप

0
13

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी तामिळनाडू सरकारवर मोठा आरोप करताना तामिळनाडू सरकारने राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातल्याचे म्हटले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द वर पोस्ट करत सीतारमण यांनी, ‘तामिळनाडू सरकारने 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यास बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये श्रीरामाची 200 हून अधिक मंदिरे आहेत. तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स विभागाद्वारे व्यवस्थापन होणाऱ्या या मंदिरांमध्ये श्रीरामाच्या नावाने पूजा/भजन/प्रसाद वाटप/अन्नदानाला परवानगी नाही. खासगी मंदिरांनाही कार्यक्रम आयोजित करण्यापासून पोलीस रोखत आहेत. मंडप पाडू, अशी धमकी आयोजकांना देत आहेत. या हिंदुद्वेषी, घृणास्पद कृतीचा मी तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील शेखर बाबू यांनी अर्थमंत्र्यांच्या विधानाचे खंडन करताना तामिळनाडूमधील कोणत्याही मंदिरात पूजा करण्यास किंवा रामासाठी अन्नदान करण्यावर कोणतीही बंदी घातली नाही असे म्हटले आहे.