वारसा स्थळातील भूरुपांतराची चौकशी करा

0
26

जागतिक वारसा स्थळ असलेल्या जुने गोवे येथील अनिवासी विभागाचे निवासी विभागात रुपांतर करण्याच्या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली जावी, अशी मागणी काल गोवा तृणमूल काँग्रेसने पत्रकार परिषदेतून केली. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना पक्षाचे सहसंयोजक समील वळवईकर हे म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार नगरनियोजन कायद्यातील 17 (2) ह्या नव्या दुरुस्तीचा फायदा उठवीत अनिवासी भू विभागांचे निवासी भू विभागात रुपांतर करीत आहे. अशा प्रकारे सरकारने लाखो चौरस मीटर जमिनीचे रुपांतर केले असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला. अलीकडेच 91842 चौरस मीटर एवढ्या जमिनीचे निवासी विभागात रुपांतर करण्यात आले असल्याचे सांगून त्यापैकी 57253 चौरस मीटर एवढी जमीन ही एला, जुने गोवे ह्या वारसा स्थळातील असल्याचा दावा त्यांनी केला.