मोस्ट वाँटेड दहशतवादी जावेद मट्टूला दिल्लीत अटक

0
12

>> दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या दहशतवादविरोधी मोहिमेला काल मोठे यश मिळाले. या विशेष पथकाने राजधानी दिल्लीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या. या दहशतवाद्याचे नाव जावेद अहमद मट्टू असे असून, तो हिजबुलचा कमांडर सुद्धा आहे. त्याच्यावर सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. तो जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता.

जावेद मट्टू हा अतिधोकादायक श्रेणीतील दहशतवादी होता. तसेच तो हिजबुलचा शेवटचा अतिधोकादायक श्रेणीतील दहशतवादी होता. संरक्षण यंत्रणांनी अलीकडच्या काळात हिजबुलच्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहेे.
पोलिसांनी जावेदला पकडल्यानंतर त्याच्याकडील पिस्तूल, गोळ्यांचे मॅगजिन, चोरी केलेली गाडी जप्त केली. जावेद मट्टू हा 5 ग्रेनेड हल्ले आणि 5 पोलिसांच्या हत्येत सहभागी होता.काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी करवाया केल्यानंतर मट्टू भूमिगत झाला होता. जावेद अहमद मट्टू हा हा जम्मू-काश्मीरमधील सोपोरचा रहिवासी आहे. सोपोर आणि किश्तवाडला लष्कर-ए-तैयबाचा गड म्हटले जायचे. त्या परिसरात त्याचा मोठा दरारा होता. काश्मीरमध्ये अनेक गंभीर गुन्हे करुन तो भूमिगत झाला होता.