मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा

0
30

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा काल घेतला. या बैठकीत केंद्रीय योजनांची अंमलबजावणी, वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग, महसूल वाढीवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय निधीच्या योग्य वापरासाठी विविध सूचना करण्यात आल्या. या बैठकीला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल आणि वित्त खात्याचे अधिकारी उपस्थित होते.