5 वर्षांनंतर राज्यातील एकाचा रेबीजने मृत्यू

0
12

राज्यात पाच वर्षानंतर एका रेबिज मृत्यूची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यातील एका व्यक्तीचा रेबिजमुळे मृत्यू झाला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी काल दिली. राज्यात कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबिज होऊ नये, यासाठी कुत्र्यांना रेबिजची लस देण्याच्या मोहिमा राबविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सप्टेंबर 2017 पासून रेबिजमुळे मृत्यूच्या घटनेची नोंद झाली नव्हती. गेल्या सप्टेंबरमध्ये उत्तर गोव्यातील एका व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला रेबिज बाधा झाली होती. इस्पितळात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.