झुआरी पूल 22 पासून पूर्णपणे खुला

0
2

>> नितीन गडकरींच्या हस्ते होणार उद्घाटन

नव्या केबल स्टेड झुआरी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. झुआरी पुलाच्या नव्या मार्गिकेची भार क्षमता चाचणी यापूर्वीच घेण्यात आलेली आहे.
930 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ह्या आठपदरी पुलाची एक बाजू यापूर्वीच पूर्ण होऊन त्यावरून वाहतूकही सुरू झालेली आहे. एक बाजू वाहतुकीसाठी खुली व्हायची असल्याने ह्या पुलावरील वाहतुकीवर काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आता 22 डिसेंबर रोजी या पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचेही उद्घाटन होणार असल्याने पुलावरील वाहतुकीसंबंधीचे निर्बंध मागे घेतले जाणार आहेत. त्यानंतर तो पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते व उड्डाण पुलांमुळे हा नवा पूल अगदी महाकाय असा बनला असून, त्याचा खर्चही प्रचंड म्हणजे अडीच हजार कोटींवर गेलेला आहे.