राज्यात 5 लाख आभा कार्ड तयार

0
31

आरोग्य सेवा संचालनालयाने राज्यात 5 लाख आयुष्यमान भारत आरोग्य खाते (आभा) आयडी तयार केले आहेत. आभा (एबीएचए) कार्डधारक 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. आभा हा एक 14 अंकी क्रमांक आहे ज्याचा वापर व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी, त्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवण्यासाठी केला जातो, असेही त्यांनी म्हटले आहे