डिचोलीत युवकाच्या संशयास्पद हालचाली

0
12

डिचोली येथील सर्कलजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शनिवारी एका अज्ञात युवकाने संशयास्पद हालचाली केल्याचे काही युवकांच्या नजरेस आल्यानंतर शिवप्रेमींनी जमा होत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी सदर व्यक्ती हैदराबाद येथील असून त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचा निष्कर्ष काढून त्याला सोडून दिले होते. मात्र, तीच व्यक्ती काल पुन्हा डिचोली येथे दिसून आल्याने शिवप्रेमी सायंकाळी एकत्र जमले. त्यावेळी सदर व्यक्ती विचित्र वागत असल्याचे निदर्शनास आले. तो विचित्रपणे वावरत असल्याचे दिसून आल्याचे महेश तेली, मंदार गावडे, विश्राम मोराजकर, मनोहर डिचोलकर यांनी सांगितले. त्याची पोलिसांनी तपासणी करून गरज भासल्यास इस्पितळात दाखल करावे तसेच त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली. सदर व्यक्त काल एका युवकास भेटला व त्याने चॉकलेट देत जे काही घडले तो प्रकार इथेच थांबवूया असे सांगितल्याचे विश्राम मोरजकर यांनी सांगितले.