तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी 119 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील तीन कोटी 26 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानासाठी 35,356 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. तेलंगणमध्ये मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पाच राज्यांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर 3 डिसेंबरला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम या सर्व राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समिती सर्व 119, तर भाजप 111 जागा लढवित आहे. भाजपने जनसेना या मित्रपक्षाला 8 जागा सोडल्या आहेत. काँग्रेस 118 जागा लढवत आहे.