भाटले पणजी येथील मशिदीजवळील सरकारी वसाहतीतील एका फ्लॅटमध्ये सोमवारी उत्तररात्री 2 च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन मुले बचावली असून फ्लॅटच्या भिंतीला भगदाड पडले आहे.
भाटले पणजी येथील सरकारी वसाहतीतील एका फ्लॅटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती दलाला सोमवारी उत्तररात्री 2 वाजता मिळाली. ही माहिती मिळताच दलाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित फ्लॅटमध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले राहत आहेत. काही कामानिमित्त पती-पत्नी बाहेर गेलेले होते. रात्रीच्या वेळी घरात हीटर सुरूच होता. हीटर भरपूर तापला होता. तेथे जवळीलच वॉशिंग मशीन होते. हीटरच्या हिट मुळे वॉशिंग मशीनने पेट घेतला. त्या मशीनच्या जवळच गॅस सिलिंडर होता. ‘त्या’ सिलिंडर आग लागून त्याचा स्फोट झाला. यात दोन्ही मुले सुदैवाने बचावली, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.