नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2024 साठी दोन शालेय कॅलेंडर जारी केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. उर्दू माध्यम शाळा आणि इतर माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र सुट्ट्यांची यादी तयार केल्याने भाजापने बिहार राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार 2024 मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी मिळणार नाही. तर, उर्दू माध्यमांच्या शाळांना ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा (बकरीद) साठी तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना दोन्ही ईदच्या सणांना फक्त एक दिवस सुट्टी असेल. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सुशील मोदी यांनी नतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने हिंदूविरोधी चेहरा दाखवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे.