मणिपुरात जीवनावश्यक वस्तुंचा सुरळीत पुरवठा

0
3

मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राजधानी इंफाळला जोडणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होते होते व त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने ही रस्त्यात थांबत होती. कुकी समुदायाकडून राज्यात आर्थिक नाकेबंदी सुरू करण्यात आली होती. मात्र आता कुकी समुदायाकडून ही आर्थिक नाकेबंदी मागे घेण्यात आली आहे. आर्थिक नाकेबंदी सुरू झाल्यामुळे इंफाळला जाणाऱ्या मालवाहू वाहनांना घाटीत पोहोचू दिले जात नव्हते. नाकाबंदीमागील मुख्य कारण म्हणजे घाटी परिसरातील मैतई लोकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकत नव्हता. राजधानी इंफाळमध्ये मैतई समाज हा मोठ्या प्रमाणात होता.