पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 107 व्या मन की बात कार्यक्रमात 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. दि. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही, या दिवशी देशावर सर्वात भयंकर हल्ला झाला होता. पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव केला, ही भारताची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी पुढे बोलताना वोकल फॉर लोकलचा उल्लेख करत देशात खादी उत्पादनांची विक्री 30 हजार कोटींपेक्षा कमी होती, ती आता 1.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आता तर घरातील मुलेही दुकानात काही खरेदी करताना त्यावर मेड इन इंडिया असल्याचे पाहत आहेत. लोक ऑनलाईन खरेदी करताना मूळ देश तपासण्यास विसरणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला.