आयएसआयएसच्या 6 संशयितांना अटक

0
21

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध भागांतून खडखड शी संबंधित असलेल्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट्स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. ते सर्वजण एसएएमयू बैठकीद्वारे एकमेकांना ओळखत होते. संबंधित संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहाजणांना अटक केल्याने अलीगढ विद्यापीठात खळबळ उडाली.