चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनात 22 टक्के वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्यक्ष कर संकलन 10.60 लाख कोटी रुपये आहे. चालू आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या प्रत्यक्ष कराच्या लक्ष्यापैकी 58 टक्के रक्कम आधीच केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाली आहे.
सीबीडीटीने प्रत्यक्ष कर संकलनाची तात्पुरती आकडेवारी जाहीर केली आहे, त्यानुसार चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात स्थिर वाढ दिसून आली आहे. प्रत्यक्ष कर संकलन 12.37 लाख कोटी रुपये झाले आहे, जे गतवर्षीच्या तुलनेत 17.59 टक्के अधिक आहे. करदात्यांना जारी केलेला परतावा वगळता, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 10.60 लाख कोटी रुपये आहे. जे मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील याच कालावधीपेक्षा 22 टक्के अधिक आहे. सीबीडीटीचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 58.15 टक्के आहे.