राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (डीए) 4 टक्क्यांनी वाढ केली असून, 1 जुलै 2023 पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे.
केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, राज्य सरकारने महागाई भत्ता वाढीचा आदेश जारी केला. सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. त्यात 4 टक्के वाढ करून 46 टक्के करण्यात आला आहे. मागील चार महिन्यांची थकबाकी नोव्हेंबरच्या पगारात जमा होणार आहे.