पोलिसांचे मनोधैर्य खचवणारी वक्तव्ये करू नयेत

0
110

क्रॉस पाडण्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी फ्रान्सिस परेरा हा एकटा वरील कृत्य करू शकत नसल्याची वक्तव्ये करून चर्चसह काही लोक संशय व्यक्त करीत आहेत. परंतु परेरा याने आपले हे गुन्हे कबूल केले असल्याचे प्रदेश भाजप प्रवक्ते नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिसांचे मनोधैर्य खचणारी वक्तव्ये कोणीही करू नयेत असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. परेरा ५५ वर्षांचा असला तरी क्रॉस पाडण्यासाठी तो सक्षम असून त्याने सर्व माहिती दिल्याचे काब्राल म्हणाले. वरील प्रकरणी पोलिसांनी सर्व दृष्टीकोनातून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.