ओलिसांच्या सुटकेनंतरच युद्धविराम ः नेतान्याहू

0
14

गाझामधील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि आणखी मदतसामग्री पोहोचण्यासाठी ‘मानवीय युद्धविराम’ करण्याकरता अमेरिकेचा दबाव इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अमान्य करत हमासने ओलीस ठेवलेल्या सुमारे 240 लोकांची सुटका केल्याशिवाय तात्पुरता युद्धविराम होणार नसल्याचे सांगितले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात इस्त्रायलने शनिवारी रात्रीही गाझा पट्टीवर हवाई हल्ला चढवला. यात 51 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले असून त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे.