>> 40 जखमी, दोन ट्रेनची समोरासमोर धडक
आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात काल झालेल्या रेल्वे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत.
विशाखापट्टणमहून रायगडकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेची पलासा एक्स्प्रेसला समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे विशाखापट्टणमहून-रायगडकडे जाणाऱ्या रल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात अधिक लोक जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. विशाखापट्टणम-रगडा (ट्रेन क्र. 08504) पॅसेंजर ट्रेन विशाखापट्टणम-पलासा (ट्रेन क्र. 08532) पॅसेंजर ट्रेनला मागून धडकली. विजयनगरम जिल्ह्यातील अलमांडा-कांकटपल्ली दरम्यान हा अपघात झाला. रेल्वेकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. विभागीय रेल्वे स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला मदत आणि रुग्णवाहिकेसाठी कळविण्यात आले आहे. अपघात निवारक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
होत्या.
मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मदत कार्यासाठी सर्व व्यवस्था करण्यास सांगितले आहे. रुग्णवाहिका आणि इतर महत्त्वाच्या वस्तू घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.
रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. पूर्व किनारपट्टी रेल्वेने आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये भुवनेश्वर- 0674-2301625, 2301525, 2303069 आणि वॉल्टेअर डिव्हिजन- 0891- 2885914 यांचा समावेश आहे.
या अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तातडीने मदत आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात येत आहेत. तसेच जखमींना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे.
पंतप्रधानांकडून आढावा
रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दुखापतग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, असे मोदी यांनी सांगितले. तसेच मोदींनी यावेळी शोकदेखील व्यक्त केला आहे.