>> ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्याने पंतप्रधान मोदींकडून खास उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या 106 व्या भागामध्ये बर्लिनमध्ये नुकत्याच झालेल्या खास ऑलपिंक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या गोव्याची क्रीडापटू सिया सरोदे हिचा नावाचा उल्लेख करून गौरव काल केला.
देशातील क्रीडापटू विविध स्पर्धांमध्ये देशाचा झेंडाही फडकत आहे. आशियाई खेळांनंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या खेळांमध्ये भारताने 111 पदके पटकावून नवा इतिहास रचला आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी खूप खूप अभिनंदन करतो. विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी खेळांकडेही मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. बर्लिनमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दिव्यांग खेळाडूंची अद्भूत क्षमता समोर आणते. या स्पर्धेत भारतीय संघाने 75 सुवर्ण पदकांसह 200 पदके जिंकली. रोलर स्केटिंग असो, बीच व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो की लॉन टेनिस असो, भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला.
या पदकविजेत्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. गोव्याच्या सिया सरोदे यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदकांसह चार पदके पटकावली. वयाच्या 9 व्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतरही त्या निराश झाल्या नाहीत.
हरियाणाच्या रणवीर सैनीने गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. लहानपणापासूनच ऑटिझमने त्रस्त असलेल्या रणवीरसाठी कोणतेही आव्हान गोल्फची आवड कमी करू शकले नाही. पुद्दुचेरीच्या 16 वर्षीय टी-विशालने चार पदके जिंकली. छत्तीसगडच्या दुर्ग येथील रहिवासी असलेल्या अनुराग प्रसादने पॉवरलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे झारखंडच्या इंदू प्रकाशची, जिने सायकलिंगमध्ये दोन पदके पटकावली आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
येत्या 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती आहे. देशात अनेक ठिकाणी एकता दौड चे आयोजन केले जाते. सर्वांनी एकता दौड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
लोकल फॉर वोकलचा मंत्र
पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये लोकल फॉर वोकलचा मंत्र दिला. पंतप्रधान मोदी यांनी, दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासीयांना फक्त मेड इन इंडिया वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करत असल्याचे सांगितले. तुम्ही जेव्हाही पर्यटन किंवा तीर्थयात्रेला जाल तेव्हा स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने नक्कीच खरेदी करा. असे आवाहन त्यांनी केले.
युवा भारत संघटनेची पायाभरणी
31 ऑक्टोबर रोजी एका खूप मोठ्या देशव्यापी संघटनेचा पाया घातला जाईल. मेरा युवा भारत असे या संघटनेचे नाव आहे. माय युवा भारत वेबसाइटही सुरू होणार आहे. वेबसाइटवर नोंदणी करून सािइन अप करावे असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले.