हळदोणा येथे अल्पवयीन मुलांवर तलवारीने हल्ला

0
25

हळदोणा येथे एका घटनेत दोन अल्पवयीन मुलांवर तलवारीने हल्ला करण्याची घटना काल घडली. यात सदर दोन्ही मुले जखमी झाली आहेत. एका मुलाबरोबर झालेल्या साध्या बाचाबाचीनंतर शशिकांत नामक इसमाने सदर दोन मुलांवर तलवारीने हल्ला केला. आरोपीला यावेळी सॅम्युएल डिसोझा नामक व्यक्तीने तलवार दिल्याचे स्पष्ट झाले आहे. जखमी मुलांपैकी एकाच्या वडिलांनी या संबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात हल्लेखोर शशिकांत हा फरारी असून त्याला हल्ला करण्यासाठी तलवार दिलेल्या सॅम्युएल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.