भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाने गोवा आणि संपूर्ण देशातून माघार घेतल्याचे अधिकृतपणे काल जाहीर केले आहे.
नैऋत्य मान्सून गोवा आणि उर्वरित भारतातून माघारीच्या सामान्य तारखा 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान आहेत. या वर्षी मोसमी पावसाच्या माघारीला राजस्थानमधून उशिराने प्रारंभ झाला होता. राज्यात या वर्षी मोसमात एकूण 132 इंच पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भारतामध्ये अल निनोचा चांगलाच प्रभाव जाणवल्यामुळे चार महिन्यांच्या (जून-सप्टेंबर) कालावधीत पाऊस कमी पडला. देशभरात या चार महिन्यांत साधारण 868.6 मिमी पाऊस पडतो, पण यंदा 820 मिमी पाऊस पडला आहे.