काँग्रेस नेते राहुल गांधींनी गौतम अदानींवर नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. फायनान्शियल टाईम्स ऑफ लंडनने दिलेल्या वृत्ताचा हवाला देऊन राहुल गांधींनी या संदर्भात मोठा दावा केला. या बातमीमुळे कोणतेही सरकार कोसळू शकेल, असे विधान राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत केल्यामुळे या वृत्ताची चर्चा सुरू झाली आहे.
अदानी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते, फायनान्शियल टाईम्स ऑफ लंडनमध्ये प्रकाशित वृत्तात म्हटले आहे. या वृत्ताचा आधार घेत राहुल गांधींनी अदानींवर घोटाळ्याचा आरोप केला. या माध्यमातून त्यांनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास 12 हजार कोटी रुपये उकळले. ही बातमी कोणतेही सरकार कोसळवू शकते, असेही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हणाले.