गिरी येथे अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

0
8

>> हिट अँड रन प्रकरणी म्हापशातील वकिलास अटक

म्हापसा टॅक्सी स्थानकावर असलेल्या साई संतोषी कोल्ड्रिंक आस्थापनाचे मालक प्रदीप प्रभाकर नार्वेकर (62 वर्षे, रा. कोलवाळ) यांचा पेडे-गिरी, म्हापसा येथील महामार्गावर चारचाकी आणि दुचाकी वाहनात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री 11.20 च्या दरम्यान घडला. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या गणेशपुरी हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथील वकिलाने अपघात स्थळावरून पलायन केले. त्याला म्हापसा पोलिसांनी अटक केली. त्याची कार देखील जप्त करण्यात आली. मिलिंद नाईक देसाई असे या वकिलाचे नाव आहे.

प्रदीप नार्वेकर हे आपल्या दुचाकी (क्र. जीए-03-एक्स-1625) ने पर्वरीहून कोलवाळच्या दिशेने जात होते. त्याचवेळी कारचालक (क्र. जीए-03-झेड-1595) दुचाकीला मागून धडक दिली. त्यात प्रदीप नार्वेकर रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत प्रदीप नार्वेकर यांना प्रथम पेडे-म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर तेथून गोमेकॉ येथील इस्पितळा नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.