निठारी हत्याकांडातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

0
4

देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मोनिंदरसिंह पंढेर या दोन आरोपींची फाशीची शिक्षा अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल काल दिला. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली. यापूर्वी गाजियबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले होते. न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती एसएचए रिझवी यांच्या खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करत निकाल राखून ठेवला होता. सोमवारी खंडपीठाने अंतिम निकाल देताना सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांची निर्दोष मुक्तता केली.
2005-2006 या कालावधीत झालेल्या लहान मुलांच्या हत्यांनी नोएडा हादरले होते. 12 प्रकरणात सुरेंद्रला तर दोन प्रकरणात मोनिंदरला दिलासा दिला. या दोघांची फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे.