केंद्राकडून 23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ जाहीर

0
18

>> चांद्रयान-3 च्या यशस्वितेसाठी इस्त्रोचा गौरव

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पाठवलेल्या चांद्रयान-3ने चंद्रावर यशस्वी लँडिंग करत एक नवा इतिहास रचला. भारताचे हे चांद्रयान-3 दि. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. इस्त्रोच्या या देदिप्यमान कामगिरीचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचना जारी
केंद्र सरकारने गॅझेट अधिसूचनेत, 23 ऑगस्ट हा देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या ऐतिहासिक मोहिमेचा परिणाम मानवजातीला पुढील काही वर्षांमध्ये लाभदायक ठरेल. हा टप्पा तरुण पिढ्यांना यातील वाढीव आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा पाठपुरावा करण्यासाठी वाढीव स्वारस्यासाठी प्रेरित करते आणि अंतराळात क्षेत्रात मोठी प्रेरणा आणि मोठी चालना देतो. या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला आहे.

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन करताना दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असे दि. 26 ऑगस्ट रोजी सांगितले होते.

भारत पहिला देश
इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

इस्त्रोकडून लवकरच पहिली मानवी मोहीम

चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेनंतर आता इस्त्रो नवीन मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. इस्रोकडून पहिली मानवी मोहीम लाँच करण्यात येणार आहे. यासाठीची महत्वाची चाचणी ऑक्टोबर महिन्यात केली जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. गगनयान मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1चे प्रक्षेपण 21 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. इस्रोचे गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूलची पहिली अबॉर्ट चाचणी 21 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. इस्रोकडून क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्टसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याबाबत पहिली मानवरहित चाचणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गगनयान मोहिमेच्या प्रणालीची चाचणी करण्यासाठी आणखी तीन चाचण्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले.