केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 9 ऑक्टोबरला जारी केलेल्या नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणा (पीएलएफएस) नुसार, सर्व वयोगटांसाठी गोव्याचा बेरोजगारीचा दर 9.7 टक्के एवढा असून, तो देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा अहवाल 22 जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. गोव्यासाठी बेरोजगारीचा दर हा राष्ट्रीय सरासरी 3.2 टक्क्यांच्या वर आहे, असे म्हटले आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर 11.3 टक्के आणि शहरी भागात 8.7 टक्के आहे. पुरुषांमध्ये हा दर 7.7 टक्के आहेख तर महिलांमध्ये तो 14.7 टक्के आहे. लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर 11.1 टक्के एवढा आह,े तर गोवा आणि अंदमान निकोबार 9.7 टक्क्यांच्या बेरोजगारी दरासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्रिपुरामध्ये बेरोजगारीचा दर सर्वांत कमी (1.4 टक्के) आहे.