धारगळ येथील आयुर्वेदिक महाविद्यालय व इस्पितळाने 12 वैद्यकीय अधिकारी पदांसह विविध पदांसाठी अर्ज मागवले असून, अर्ज मागवलेल्या पदांची संख्या 129 एवढी आहे. अन्य पदांमध्ये 20 परिचारिका, 1 प्रयोगशाळा सहाय्यक, 10 प्रयोगशाळा अटेंडंट, 16 वॉर्ड अटेंडंट, 1 रेडिओलॉजी अटेंडंट, 1 फार्मासिस्ट, 5 पंचकर्म तज्ज्ञ, 10 पंचकर्म अटेंडंट, 1 योग थेरिपिस्ट, 10 डेटा एन्ट्री ऑपरेटर्स आदींचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर अशी आहे. अर्ज ऑनलाईन पाठवावेत, असे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित बेसील ह्या कंपनीने ही जाहिरात जारी केली आहे.