दबावाला बळी न पडता तपासकाम करा : कॉंग्रेस

0
117

आपली स्नुषा श्वेता होबळे यांना हुंड्यासाठी कथित मारहाण केल्याचा भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे व त्यांच्या कुटुंबीयावर जो आरोप आहे त्याप्रकरणी पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गंभीरपणे तपासकाम करावे, अशी मागणी काल महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली महिला कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक संध्या गुप्ता यांच्याकडे केली. आम्हांला या प्रकरणाचा राजकीय लाभ घ्यायचा नसून पीडित श्वेता होबळे यांना न्याय मिळावा यासाठीच आम्ही पोलीस स्थानकावर आलो होतो, असे पत्रकारांशी बोलताना कुतिन्हो यांनी सांगितले.