दिल्लीसह उत्तर भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

0
9

राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. तेथे दोनदा भूकंप झाले. दुपारी 2.25 वाजता जाणवलेला पहिला भूकंपाचा धक्का 4.6 रिश्टर स्केलचा होता, तर दुसरा 2.53 वाजता जाणवलेला धक्का 6.2 रिश्टर स्केलचा होता. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये जोरदार हादरे जाणवले.

उत्तर प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले, त्याची तीव्रता 5.5 इतकी मोजली गेली. हरियाणामध्ये मंगळवारी दिवसभरात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला पानिपत, रोहतक, जिंद, रेवाडी आणि चंदीगड आदी भागात दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याआधी सकाळी सोनीपतमध्ये 2.7 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला होता.