बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर

0
15

बिहार सरकारने जातीनिहाय गणनेची आकडेवारी काल जाहीर केली. देशात प्रथमच एखाद्या राज्याकडून अशी जातीनिहाय जनगणना जाहीर केली आहे.

बिहार सरकारने जातीय जनगणनेचे आकडे जाहीर केले आहेत. बिहारमध्ये ओबीसींची लोकसंख्या 63 टक्के आहे. 27 टक्के लोकसंख्या मागास, तर 36 टक्के अतिमागास आहे. दलितांची संख्या 19 टक्के, तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के एवढी आहे. तसेच अनारक्षित सर्वसाधारण लोकसंख्या 15.52 टक्के आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारने सोमवारी पत्रकार परिषदेत जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. बिहारचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी सादर केली.
सरकारने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये 13 कोटी लोकसंख्या आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत.

राज्यात ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे. बिहारमधील भूमिहीन लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या 14 टक्के तर, कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या 40 टक्के आहे.