3 परप्रांतीय मुलांकडून 12 लाखांचा गांजा जप्त

0
26

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने शिरसई येथे छापा टाकून तीन अल्पवयीन परप्रांतीय मुलांकडून सुमारे 12 लाख रुपयांचा गांजा हा अमलीपदार्थ जप्त केला. ही कारवाई काल संध्याकाळी करण्यात आली. शिरसई येथील बसथांब्याजवळ तीन परप्रांतीय मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. ही तिन्ही मुले अल्पवयीन बिहार राज्यातील आहेत. या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे.