पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल राजस्थानच्या दौऱ्यात चित्तोडगड येथे आयोजित एका कार्यक्रमात तब्बल 7,000 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकासकामांची पायाभरणी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे राजस्थानचा विकास ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहून खूप वाईट वाटत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची, अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणे राजस्थानमध्येच पाहायला मिळत आहेत. तुम्ही यासाठीच काँग्रेसला मतदान केले होते का, असा सवालही मोदींनी केला.