स्टेमी हृदयविकाराची 2018 पासून राज्यात 3921 प्रकरणे ः आरोग्यमंत्री

0
18

गोवा सरकारने डिसेंबर 2018 ला स्टेमी प्रकल्पाची अमलबजावणी केल्यापासून सुमारे 3921 स्टेमी हृदयविकाराची प्रकरणे हाताळली. तसेच तब्बल 12299 एवढ्या ईसीजीसंबंधीच्या चिंताजनक प्रकरणांचे निदान केले आणि 2948 एवढ्या रुग्णांच्या हृदयवाहिन्यांतील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकल्या, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

स्टेमी प्रकल्प हा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ राज्यातील सरकारी इस्पितळे व राज्यातील तीन आघाडीच्या खासगी इस्पितळांच्या मदतीने यशस्वीपणे राबवीत असल्याची माहिती राणे यांनी यावेळी दिली.
हृदयविकाराचा झटका आलेल्या अथवा हृदयासंबंधीची समस्या निर्माण झालेल्या रुग्णांना कमीत कमी वेळात ही सेवा देणाऱ्या जवळच्या इस्पितळात पोचता यावे यासाठी गोमेकॉ व अन्य 8 सरकारी इस्पितळे व 3 खासगी इस्पितळे असे इस्पितळाचे जाळे स्टेमी प्रकल्प योजनेखाली विणण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी राणे यांनी दिली.