महिला आरक्षण विधेयकाचे काल दि. 29 सप्टेंबर रोजी कायद्यात रुपांतर झाले असून नारी शक्ती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेमध्ये दि. 20 सप्टेेंंबर व राज्यसभेत 21 सप्टेंबर रोजी हे विधेयक सर्व संमतीने मंजुर करण्यात आले होते. काल दि. 29 रोजी त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. मात्र या विधेयकाचे जरी कायद्यात रुपांतर झाले तरी ते प्रत्यक्षात 2026 नंतरच लागू होणार आहे