महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचे आजपासून बेमुदत उपोषण

0
19

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ दिली आहे. परंतु इतर प्रलंबित मागण्यांसाठी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता करावा यासाठी एसटी कामगार संघटनेने आज सोमवार 11 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. गेल्यावर्षीच्या साडेपाच महिन्याच्या संपानंतर पुन्हा एकदा लालपरीची वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणते निर्णय़ घेण्यात येतात, त्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. जुन्या दरपत्रकाप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती बंद करून विविध 29 मागण्या संघटनेने केल्या आहेत.