नगरनियोजन खात्याकडून भू-रुपांतराचा सपाटा

0
13

राज्यातील 27,384 चौरस मीटर जमीन सेटलमेंट झोनमध्ये रुपांतरित

नगरनियोजन खात्याने टीसीपी कलम 17 (2) अंर्तगत प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये शेती-बागायती, नैसर्गिक जंगल अशी राखीव ठेवलेली आसगाव, चिंबल, खोर्ली, रेवोडा आणि लोटली येथील सुमारे 27,384 चौरस मीटर जमीन सेटलमेंट झोनमध्ये आणली आहे.

यासंबंधीची विभाग सुधारणा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नगरनियोजन खात्याने टीसीपी कलम 17 (2) अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेती, बागायती आणि नैसर्गिक जंगल अशा राखीव ठेवलेल्या जमिनी सेटलमेंट झोन खाली आणण्याचा सपाटा लावला आहे. आसगाव गावातील सर्व्हे क्रमांक 147, उपविभाग क्रमांक 9 अंतर्गत सर्व्हे केलेले 1000 चौरस मीटर भूखंड सेटलमेंट झोनमध्ये आणण्यात आले आहेत.

चिंबल येथील प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये बागायती म्हणून निश्चित केलेले सर्व्हे क्रमांक 34, उपविभाग क्रमांक 1 (भाग) अंतर्गत 15,533 चौरस मीटर जमीन सेटलमेंट झोनमध्ये आणण्यात आली आहे.
रेवोडा सर्व्हे क्रमांक 32, उपविभाग क्रमांक 1 आणि सर्वेक्षण क्रमांक 31, गावातील उपविभाग क्रमांक 4 मधील बाग म्हणून निश्चित केलेला 4000 हजार चौरस मीटरचा भूखंड सेटलमेंट झोनमध्ये आणण्यात आला आहे.

प्रादेशिक आराखडा 2021 नुसार फळबागा म्हणून निश्चित केलेल्या लोटली गावातील सर्व्हे क्रमांक 334, उपविभाग क्रमांक 2-अ अंतर्गत सर्वेक्षण केलेल्या 2693 चौरस मीटर भूखंड सामान्य उद्योग म्हणून दुरुस्त करण्यात आला आहे.

प्रादेशिक आराखडा 2021 नुसार सामान्य उद्योग म्हणून निश्चित केलेल्या खोर्ली तिसवाडी गावातील सर्व्हे क्रमांक 60, उपविभाग क्रमांक 5 अंतर्गत सर्वेक्षण केलेल्या 4158 चौरस मीटरचा भूखंड सेटलमेंट झोन म्हणून दुरुस्त करण्यात आला आहे.