प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

0
15

येथील पणजी महिला पोलिसांनी उत्तर गोव्यातील एका शैक्षणिक संस्थेतील एका प्राध्यापकाच्या विरोधात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संशयित प्राध्यापकाला समन्स पाठवून चौकशीसाठी पोलीस स्थानकावर हजर राहण्याचे निर्देश काल दिले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीची जबानी नोंद करून घेतली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी संस्थेच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती; मात्र त्याची दखल न घेण्यात आल्याने पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.