चंद्रावर रोव्हरसमोर आला 4 मीटर रुंद खड्डा

0
30

इस्रोने सोमवारी चांद्रयान-3च्या प्रज्ञान रोव्हरचे काही फोटो शेअर केले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना त्याच्या वाटेत एक मोठा विवर अर्थात खड्डा आला होता. त्या खड्ड्याचा व्यास 4 मीटर एवढा होता. इस्रोने या खड्ड्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. 27 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना प्रज्ञान रोव्हर एका मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचला. त्यानंतर रोव्हरला मागे वळण्याची सूचना (कमांड) देण्यात आली. त्यानंतर रोव्हर सुरक्षितपणे माघारी परतला. तत्पूर्वी, रोव्हरला आणखी एका खड्ड्याचा सामना करावा लागला होता.