वीज बिले ऑनलाईन देण्याचा निर्णय : वीजमंत्री

0
171

>> कार्यवाहीसाठी सल्लागार नेमणार

वीज खात्याने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना ऑनलाईन बिले देण्याचे ठरविले असून सदर प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे ठरविले आहे. पुढील काळात वरील सुविधा ग्राहकांना मिळू शकेल व विजेची बिले कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑनलाईन पद्धतीने सुरू करणे शक्य होईल, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
खात्याने ऑनलाईन पद्धतीने बिले भरण्याची यापूर्वीच सोय केली होती. परंतु त्यात काही त्रुटी असल्याने ग्राहकांकडून समाधानकारक असा प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने सौरउर्जा धोरण तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठी ‘गेडा’ने मसुदाही तयार केला आहे. याविषयी जनतेकडून सूचना मागविण्याची तारीख १४ जुलै २०१७ पर्यंत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अनेक कंपन्यांनी गोव्यात सौरउर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे परिपूर्ण असे धोरण तयार करण्याचा सरकारचा हेतू असल्याचे मडकईकर यांनी सांगितले. सूचना पाठविण्यासाठीचे संकेत स्थळ ुुु.वीींशसेर.र्सेीं.ळप असे आहे. सध्या राज्यात १.६८ मॅगावॅट सौरऊर्जा तयार केली जाते. २०-२० पर्यंत १५१ मॅगावॅट तयार करण्याची गरज आहे. सरकारने अनेक व्यक्तिंना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. परंतु हवा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. कोळसा, गॅस व पाण्यापासून वीज तयार केली जात आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जेची निर्मिती व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशनने गंभीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पास प्राधान्य दिल्याचे मडकईकर यांनी सांगितले.