पर्वरीतील नागरिकांनी लुटला चांद्रयान प्रक्षेपणाचा आनंद

0
7

चांद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्याची संधी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्वरीतील रहिवाशांना प्राप्त करून दिली. काल बुधवारी (दि. 23) सायंकाळी येथील आर्ट पार्क उद्यानातील मनोऱ्यावरील मोठ्या स्क्रीनवर चांद्रयान 3 चे प्रक्षेपण उपस्थितांना पाहावयास मिळाले. चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग पाहण्याचे भाग्य येथील रहिवाशांना मिळाले. या यशाबद्दल भारत माता की जय या उद्घोषाने आर्ट पार्कमधील वातावरण उल्हसित झाले होते. यावेळी मंत्री खंवटे यांच्यासमवेत पेन्ह द फ्रान्स पंचायतीचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, इतर पंच सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यात छोट्या मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता.