पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून मागणी
हिंदुत्ववादी कार्यकर्ते संभाजी भिडे यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त करत त्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसने काल मंगळवारी केली. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके यांनी मंगळवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकरही उपस्थित होते.
संभाजी भिडे यांच्यावर अनेक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रमोद मुतालिक यांच्यावर बंदी आहे, संभाजी भिडेंवर बंदी का नाही? असा सवाल भिके यांनी केला आहे.
राष्ट्रपतींनी मणीपूरलाही जावे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे तीन दिवसीय गोवा दौऱ्याचे स्वागत करताना भिके यांनी, राष्ट्रपतींनी मणिपूरलाही भेट द्यावी कारण तिथे आपल्या लोकांना त्रास होत आहे. हा भारताचा भाग आहे आणि त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी मणिपूरलाही भेट द्यावी. तसेच राष्ट्रपतींना मणिपूरवर विधान करण्याची विनंती करत असल्याचे सांगितले.