चर्चिलना राष्ट्रवादीत प्रवेश नाही

0
25

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्पष्ट

तृणमूल काँग्रेसचा त्याग केलेल्या चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा प्रदेश अध्यक्षपदी जुझे फिलीप डिसोझा हेच राहणार असल्याचे शरद पवार यांचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी वरील स्पष्टीकरण केले आहे.

दरम्यान, आलेमाव हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात प्रवेश करू पाहत असल्याचे वृत्त आहे. आलेमाव यांनी आपल्या मुंबई भेटीत राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. आलेमाव यांच्या या भेटीत त्यांनी श्री. पटेल यांच्याबरोबर फुटबॉल खेळाविषयीही चर्चा केली.
गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चिल यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र, या निवडणुकीत बाणावलीतून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेल्या चर्चिल यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार व्हेंन्झी व्हिएगश यांनी पराभव केला होता.