गोव्यात धार्मिक कलह कदापि करू देणार नाही

0
70

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष मुलाखतीत ग्वाही

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. पण गोवा मुक्तीपासून आजतागायत राज्यात कधीही धार्मिक कलह अथवा दंगली झालेल्या नाहीत. काही लोक आता आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्यात धार्मिक कलह निर्माण करू पाहत आहेत, पण त्यात त्यांना कदापि यश येणार नाही, आपले सरकार त्यांना तसे करू देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दैनिक नवप्रभाला 53 व्या वर्धापनदिनानिमित्ताने दिलेल्या विशेष मुलाखतीत केले.