कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशासाठी तगादा लावल्यानेच देसाई यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेऊन खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, काल एनडी स्टुडिओत कुटुंबीय, शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत देसाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.