अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी भारतीय पुरातत्त्व खात्याला (एएसआय) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणास परवानगी दिली. उच्च न्यायालयाने तातडीने सत्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे म्हणजेच सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. मुख्य न्यायाधीश प्रीतिनकर दिवाकर यांच्या एकल खंडपीठाने हा निकाल दिला. सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार देत न्यायालयाने हे सर्वेक्षण न्यायासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षण करा; परंतु खोदल्याशिवाय, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.