दक्षिण मध्य रेल्वेमार्गावरील करंझोळ येथे रेल्वे रुळावर पडलेली दरड काल पाच दिवसांनंतर काढून हा रेल्वेमार्ग मोकळा करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. मात्र या मार्गावरून प्रवासी रेल्वे अद्याप सुरू झालेली नाही. पण काल दुपारी 3.30 वा. एक मालवाहू रेलगाडी या मार्गावरून सोडण्यात आली. परंतु खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वेगाडीचा वेग ताशी 10 किमी एवढा मर्यादित ठेवण्याचा निर्णय रेल्वे घेतला आहे.
या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या एकतर रद्द करण्यात आल्या आहेत किंवा दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.
करंझोळ येथे दरड कोसळल्यामुळे जो रेल्वेमार्ग बंद करण्यात आला होता. तो मार्ग आता पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर काल दुपारी 1 च्या सुमारास खुला करण्यात दक्षिण मध्य रेल्वेला यश आले आहे.
मुसळधार पावसामुळे दूधसागर धबधब्याजवळ 25 जुलै रोजी ही दरड कोसळली होती आणि त्या दिवसापासून दक्षिण मध्य रेल्वेची या या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.