‘संजीवनी’चे अनुदान सहा महिन्यांनी वाढवले

0
7

संजीवनी साखर कारखाना बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने या कारखान्यासाठी सुरु केलेले अनुदान आणखी सहा महिन्यांनी वाढवले आहे. हे अनुदान सहा महिने अथवा कारखान्यातील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा लाभ देण्यात येईपर्यंत दिले जाणार आहे. सदर अनुदान कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान तसेच कारखान्यावर येणारा अन्य खर्च यासाठी देण्यात येते. हा कारखाना नुकसानीत चालत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद सावंत सरकारने तो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदान देण्याची मागणी केली होती.