आज शाळा सुरुच राहणार; सुट्टी नाही

0
3

शिक्षण खात्याने गुरुवारी राज्यातील शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काल दिली. तथापि, गुरुवारी पावसाच्या प्रमाणात वाढ झाली, तरच सुट्टी देण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने शाळांना सुट्टी देण्याची मागणी विरोधी पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल विधानसभेत केली. त्यावर शिक्षण खाते परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.